चाचणी मजकूर - सावंतवाडी तालुक्यात येतं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण. याच परिसरात हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान आहे. हिवाळ्यात तसंच पावसाळ्यात येथील अद्भुत निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. याच सावंतवाडी तालुक्यातच पत्रादेवी इथे गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचं स्मारक आहे तर इथून जवळच बांदा या ठिकाणी बांदेश्वर व रामेश्वराची मंदिरं आहेत. संत सोहिरोबानाथांचं स्थान अशीही बांद्याची ओळख आहे.